सामुदाईक विवाह सोहळ्यात दोन जोडपी विवाहबध्द
अहमदनगर, दि. 14 - श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट मोहटे संस्थानच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता.या विवाह सोहळ्यात दोन जोडपी विवाहबद्ध झाली.संस्थानच्या वतीने वधू-वरांचा यावेळी यथोच्छित असा सन्मान करण्यात आला.
श्री क्षेत्र मोहटादेवी येथे श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट च्या वतीने देवस्थान समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या संकल्पनेतून या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.गेल्या वर्षीपासून सामुदायिक विवाह सोहळ्याचे संस्थानच्या वतीने आयोजन केले जाते. नियोजित वेळेनुसार मंदिराच्या मुख्य हॉल मध्ये ही दोन जोडपी विवाह बंधनात अडकली.नवदाम्पत्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी माजी आमदार दगडू पाटील बडे तसेच संस्थानचे विश्वस्त भास्करराव सांगळे,शिवाजी पालवे,मोहटेचे सरपंच तथा विश्वस्त डॉ.हर्षवर्धन पालवे,राजेंद्र भंडारी,अरुण दहिफळे,रामदास पालवे,सुनीता शिंदे,राजेंद्र शिंदे,संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे,मोहटा सोसायटीचे चेअरमन भीमराव पालवे,माजी विश्वस्त रामकीसन फुंदे,किरण आव्हाड,मुलाचे वडील रामराव गर्जे,मुलीचे वडील सुखदेव बडे तर दुसर्या मुलाचे वडील धोंडिराम घोरपडे,मुलीचे वडील मीरावली वाघमारे तसेच दोन्ही विवाहासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.या विवाह सोहळ्यात मोहटे येथील ज्ञानेश्वर गर्जे व सुनीता बडे तर तिनखडी येथील अंबादास घोरपडे व सुवर्णा वाघमारे या दोन जोडप्यांचा विवाह सोहळा पार पडला.यावेळी संस्थानच्या वतीने दोन्ही मुलांच्या आई-वडिलांचा सन्मान करण्यात आला.देवस्थान समितीच्या वतीने भोजनकशात हजारो लोकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.