Breaking News

अक्षयतृतीया निमित्त रिमांडहोमला किराणा वस्तूंची भेट

अहमदनगर, दि. 29 - वंचितांसमवेत सण, उत्सव व वाढदिवस साजरा करण्यात खरा आनंद व समाधान मिळतो. इतर प्रचलित पध्दतीने सेलिब्रेशन करण्यापेक्षा सामाजिक भावनेने उपेक्षितांना केलेली मदत प्रेरणादायी आहे. अक्षयतृतीयाच्या मुहुर्तावर रिमांड होममध्ये घेण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे आ.संग्राम जगताप यांनी सांगितले.
श्रीमंतयोगी प्रतिष्ठाण, महाराज ग्रुप, व फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने अक्षयतृतीया निमित्त रिमांडहोममधील मुलांसाठी किराणा वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी आ.जगताप बोलत होते. याप्रसंगी प्रा.आनंद सुरसे, योगेश सुरसे, जालिंदर बोरुडे, पै.पवन भिंगारे, आकाश भिंगारे, महेश सुरसे, वैभव वाघ, युवराज ढगे, शेखर नागुल, अतुल कावळे, संदीप खरात, सागर चव्हाण, सोमनाथ चितळकर, मयुर ढगे, अक्षय सोनवणे, पवण दाणे, सनी जाधव, प्राजक्ता जोशी, दुर्गा सादूल, रेखा जाधव, पौर्णिमा माने, प्रा. ढेरे, चेतन नागुल, राहुल सारसर, रोहीत सारसर, मनोज कापसे, ओंकार नागुल, देवेंद्र देशमुख, सनी विधाते, सोनू राणा, रजनीश वाघ, संतोष भिंगारदिवे आदि उपस्थित होते. प्रा.आनंद सुरसे यांनी सर्व अनावश्यक खर्चांना फाटा देवून, आपला वाढदिवस रिमांडहोममधील मुलांसमवेत साजरा केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रिमांड होमच्या सुलोचना कालापहाड यांनी केले. आभार जालिंदर बोरुडे यांनी मानले.