Breaking News

मिरजगाव येथे ट्रक व पिकप व्हॉनचा अपघात ; एकाचा मृत्यू

अहमदनगर, दि. 29 - येथील तनपुरे पेट्रोल पंतप जवळ ट्रक व पिकप यांच्यामध्ये समोरा समोर जोरदार धडक हावून या अपघातामध्ये पिकप व्हॉनचा चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सविस्तर मिळालेली माहिती अशी की, नगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मिरजगांव येथे शुक्रवारी सकाळी 6.00 च्या सुमारास मालट्रवकव पिकअप यांच्यात समोरा समोर जारदार धडक होवुन यामध्ये पिकअपचा चालक उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर पिकअपमधील एक जण उपचार घेत असुन गंभीर जखमी आहे.
मिरजगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार दि.28 एप्रिल रोजी सकाळी सहाच्या सुमारास तामिळनाडू कडून नगर च्या दिशेने कपड्याच्या गाठी घेवुन येणारा मालट्रक क्र.टी.एन.52 एच 7363 व नगर कडून मिरजगांवच्या दिशेने येणार पिकअप क्र.एम.एच 16 एवाय 4972 यांच्यात मिरजगांव येथिल तनपुररू पेट्रोल पंपा जवळ समोरा समोर धडक झाली. यामध्ये पिकपचा चालक अजिनाथ बाळू दवणे वय 28 रा.बेनवडी ता.कर्जत हा उपचारा दरम्यान मरण पावला तर त्याच्या शेजारी बसलेला गाडी मालक हनुमंत दशरथ गदादे वय 32 रा बेलवडी ता.कर्जत हा गंभिर जखमी झाला आहे. तर ट्रक चालक ही जखमी झाला. हि धडक एवढी जबरदस्त होती की, यामध्ये पिकपचा चेंदामेंदा झाला. सदरील पिकप दि.27 रोजी राहता जि.अहमदनगर येथे रात्री बेनवडी भागातील डाळींब घेवुन गेली होती. राहता येथे डाळींब विकुन ते परतत असताना हा भिषण अपघात घडला.