अकोले तालुक्यात पुढील आमदार सेनेचाच
युवा नेते सतिष भांगरेंचा आशावाद ; वाढदिवसानिमित्त सत्कार
अकोले, दि. 28 - अकोले विधानसभा मतदार संघात शिवसेना पक्ष दुसर्या क्रमांकाचा असून मिनी विधानसभा समजल्या जाणार्या पंचायत समितीवर भगवा फडकविला असून येत्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचाच आमदार होईल, असे मत शिवसेनेचे युवा नेते सतिष भांगरे यांनी नुकतेच आपल्या अभिष्टचिंतन सोहळया प्रसंगी बोलताना व्यक्त केले.अकोले येथे शिवसेना कार्यकर्त्यांनी सतिष भांगरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने अकोले शहरात आयोजित केलेल्या छोटयाखानी समारंभात युवकांची उपस्थिती लक्षणीय होती. मला अकोले विधानसभा मतदार संघात तरुणांना परिवर्तनाची लाट हवी असून मतदार संघातील प्रत्येक गाव वाडयावस्त्यांवर जावून जनतेचे प्रश्न समजावून घेतले, ते सोडविण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत सेनेने विविध जागांवर दणदणीत विजय करत मिनी विधानसभा समजल्या जाणार्या अकोले पंचायत समितीवर सभापती व उपसभापती आमच्याच पक्षाचा झाला. त्यामुळे तालुक्यातील गावागावात शासनाच्या योजना पोहचविण्यासाठी आमचे पदाधिकारी नक्कीच आघाडीवर राहतील. उमेदवारी मिळो अथवा न मिळो मात्र गावागावात शाखा स्थापन करुन कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ काढून टाकत तरुणांना साथ देत नवा इतिहास रचन्याचा संकल्प असण्याची भांगरे यांनी सांगितले. यावेळी भांगरे यांचा शिवरायाची प्रतिमा देवून सन्मान करण्यात आला. तर यावेळी शिवसेना नेते माधवराव तिटमे यांनी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. विजय आपलाच आहे. गट तट बाजूला सारुन एकत्र येणे ही काळाची गरज आहे. तर धुमाळवाडी ग्रामपंचायचे उपसरपंच रवी गोर्डे, शिवसेनेचे जेष्ठ नेते सुरेश भिसे, उपसभापती मारुती मेंगाळ, उद्योजक सुनील गिते, अतुल लोहटे, बाळासाहेब मालुंजकर यांची भाषणे झाली. तर कार्यक्रम यशस्वितेसाठी गणेश धुमाळ, संदेश वाळूंज, सतिष नवले, प्रशांत फलके, रोहिदास धुमाळ, मिलिंद नाईकवाडी, अनिल वाकचौरे, संदिप दराडे, उद्योजक रविंद्र गजे, विशाल हुलवळे, आदिंनी परिश्रम घेतले.