सेंद्रिय शेतीत वाकचौरेंचे कार्य दिशा देणारे : बराते
अकोले, दि. 28 - सेंद्रिय शेती आता एक चळवळ सुरु झाली आहे. या चळवळीत संपत वाकचौरे समाधान कारक असुन इतर शेतकर्यांना दिशा देणारे आहे. या शब्दात वाकचौरे यांच्या, सेंद्रिय कामांची प्रशंसा, प्रकल्प संचालक आत्मा अहमदनगर भाऊसाहेब बराटे यांनी केली.
अकोले तालुक्यातील सेंद्रिय शेती गटाच्या उपक्रमांची पहाणी करण्यासाठी अकोले भेट दौर्यावर आलेले होते. याप्रसंगी श्री. बराटे बोलत होते. त्यांनी वाशेरे येथील संपतराव वाकचौरे यांच्या सेंद्रिय उपक्रम, गांडूळ खत, स्लरी, दशपर्णी अर्क, पारंपारिक गावरान बियाणे बँक, डायोनामीक, विविध सेंद्रिय निविष्ठा, तसेच सेंद्रिय पध्दतीने पिकविलेला, कांदा, हरभरा, गहू या वाणांची पहाणी करुन समाधान व्यक्त केले. यावेळी वाकचौरे यांना सेंद्रिय पिक प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच यावेळी कुसुमताई वाकचौरे यांनी, विविध गावरान बियाणांची माहिती दिली. वाकचौरे यांनी सेंद्रिय शेती व जीवनपध्दती याचा पाढा वाचून दाखविला. हे सर्व पाहून व ऐकून, बराटे यांनी खूप समाधान व्यक्त केले. तसेच या दिवसांत त्यांनी ढोकरी येथील बबणराव शेटे यांच्या सेंद्रिय उपक्रमास व मेहेंदुरी येथील आरोटे यांच्या शेतीमाल उत्पादक कंपणीस व अन्य ठिकाणी भेटी दिल्या. यावेळी त्याच्या समवेत आत्माचे बाळनाथ सोणवणे, स्वप्निल बुळे हे उपस्थित होते.