Breaking News

संग्राम पतसंस्थेस सुमारे दीड कोटीचा नफा

संगमनेर (प्रतिनिधी), दि. 28 - आ.बाळासाहेब थोरात व आ. डॉ सुधीर तांबे यांचे मार्गदर्शनाखाली संग्राम नागरी सहकारी पतसंस्थेने सन 2016-2017 या आर्थिक वर्षात उत्तुंग भरारी घेऊन संगमनेर शहरातील अग्रगण्य पतसंस्था असा लौकिक प्राप्त केला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन डॉ.एन.एस शेख यांनी दिली आहे. 
संग्राम पतसंस्थेचे 31/03/2017 अखेर वसुल भागभांडवल 1 कोटी 19 लाख, ठेवी 50 कोटी , कर्ज 40 कोटी 91 लाख , गुंतवणुक 20 कोटी 90 लाख, स्व:निधी  8 कोटी 23 लाख सि.डी रेश्यो 73.40 % आहे. सर्व तरतुदी वजा जाता 1 कोटी 51 लाख इतका नफा झाला आहे.  नोटा बंदीच्या काळातही संस्था थकबाकी 2% राखण्यास यशस्वी ठरली आहे. संस्थेने सुरूवातीपासुनच सातत्याने अ वर्ग राखला असून आर्थिक शिस्त नियमांचे पालन केलेे.
सामान्य व्यवसायिकांना आधार देण्याचे आणि त्यांचे जीवनात समृध्दी आणण्याचे काम संस्था करीत आहे. कमीत -कमी कागदपत्रे व त्वरीत कर्ज वितरण ही संस्थेची वैशिष्ठे आहेत. संस्थेने ठेवीदार व ज्येष्ठ नागरीकासांठी विविध ठेव योजना सुरू केल्या आहेत. सभासद, ठेवीदार, कर्जदार हे सुरक्षिततेच्या दृष्टीने संस्थेकडे आकर्षित झाले आहेत. तसेच संस्थेचा सामाजिक बांधिलकीतून वृक्षारोपन, सामुदायिक विवाह सोहळा,  मतीमंद व  मुकबधीर विद्यालय अशा  उपक्रमात सहभाग आहे. त्याप्रमाणे संस्थेने दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आर्थिक मदत दिलेली आहे. तसेच संस्थेने इ.10 वी चे परिक्षार्थीना शुभेच्छा देण्याचा उपक्रम या वर्षी पासून सुरू केला आहे. संस्थेच्या वडगावपान, आश्‍वी बु॥, घारगाव येथील शाखादेखील नफ्यात आहे. संस्थेच्या आर्थिक परिस्थिीतीचा व दैनंदिन कामकाजाचा आढावा संस्थेचे संस्थापक चेअरमन आ. डॉ. सुधीर तांबे हे सतत घेत असतात.
सर्व कामकाजाबद्दल आ. बाळासाहेब थोरात व आमदार. डॉ. सुधीर तांबे  यांनी समाधान व्यक्त करून चेअरमन डॉ .एन. एस. शेख, व्हा. चेअरमन .राणीप्रसाद मुदंडा व संचालक डॉ. दत्तात्रय शिंदे , विलास दिघे, विजय गिरी, सुर्यकांत शिंदे, डॉ.माणिक शेवाळे, राजेंद्र काजळे , सौ.सुलभा दिघे ,सौ.सुनंदा दिघे, किशोर टोकसे ,अ‍ॅड. प्रशांत गुंजाळ व्यवस्थापक उमेश शिंदे  व सर्व कर्मचारी वर्गाचे कौतुक व अभिनंदन करून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.