दोन दिवसीय प्रथमोपचार प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन
बुलडाणा, दि. 21 - अपघात झाल्यानंतर जखमी व्यक्तीला प्रथमोपचार तातडीने मिळाल्यास त्याचे प्राण वाचू शकतात परंतु सर्वप्रथम प्रथमोपचार कशा पध्दतीने करायचे त्यासाठी कोणती दक्षता घ्यायची याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. त्याकरीता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत दोन दिवसीय प्रथमोपचार प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. नियोजन भवनात या कार्यशाळेचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गजानन सुरंजे नायब तहसीलदार राजेंद्र इंगळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे, प्रशिक्षक डॉ.अनिल क्षीरसागर, डॉ. बाळकृष्ण परब आदी मान्यवरांसह शोध बचाव पथकातील सदस्य, पोलिस, होमगार्ड, अग्निशमन, विभागाचे कर्मचारी, एनएसएसचे विद्यार्थी हजर होते.
यावेळी देशपांडे म्हणाले की, अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या घटना सातत्याने होत असतात यामध्ये अनेकांचे बळी केवळ प्रथमोपचार न मिळाल्याने जातात. प्रथमोपचाराची माहिती असल्यास जखमींचे प्राण वाचविणे सहज शक्य आहे पण त्यासाठी प्रथमोपचाराची माहिती असणे गरजेचे आहे. यासाठी या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
यानंतर प्रशिक्षक डॉ. अनिल क्षीरसागर यांनी सादरीकरणाव्दारे प्रथमोपचार म्हणजे काय, प्रथमोपचार कधी करायचे, प्रथमोपचार किती वेळ करायचा याबाबत सविस्तर माहिती दिली.आजुबाजूला उपलब्ध गोष्टींच्या माध्यमातून प्रथमोपचार करता येऊ शकतो डॉक्टर येईपयर्ंत किंवा रुग्णाला हॉस्पिटलपयर्ंत नेईपयर्ंत प्रथमोपचार करता येऊ शकतात अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.