Breaking News

मराठा समाजाच्या एकत्रीत बांधणीसाठी आपापसातील मनभेद विसरणे गरजेचे - अ‍ॅड. पुरूषोत्तम खेडेकर

बुलडाणा, दि. 21 -  मराठा समाजाला एक सुत्रात बांधणी करण्याच्या हेतूने आपापसातील मतभेद, मनभेद विसरणे गरजेचे आहे. समाजाचे सर्वच क्षेत्रातील विविध स्तर उंचाविणासाठी, सक्षमीकरणातून सबलीकरणासाठी प्रत्येकानी एकत्र येणाचे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक अँड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले. जिजाऊ सांस्कृतिक भवन, जुने आरटीओ रोड येथे मराठा सेवा संघाची पुर्नबांधणी व सबलीकरण सभेमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. 
यावेळी विचारपीठावर मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप साबळे, डॉ. पुरुषोत्तम तायडे, डॉ. सीमाताई तायडे, जिल्हाद्यक्ष अशोक पटोकार, डॉ.दीपक मोरे, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. साधनाताई ठाकरे यांनी जिजाऊ वंदना सादर केली तर प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे जिल्हाद्यक्ष अशोक पटोकार यांनी केले. मराठा सेवा संघाने आजवर समाजाच्या प्रगतीसाठी विविध कक्षाची बांधणी केली आहे. त्यामाध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबवित आहे. राज्यभरात सुरू असलेल्या वसतिगृहाच्या, जिजाऊ सृष्टी, अधिवेशन, भविष्यातील ध्येय्यधोरणे, नियोजन, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. संपूर्ण महाराष्ट्रभर सलग दोन वर्ष ही सबलीकरण मोहीम सुरू राहणार आहे.
या सभेत मराठा सेवा संघाची पुर्नबांधनी करून सेवा संघाच्या कार्याची गति वाढवून समाजाच्या शेवटच्या घटकापयर्ंत पोहचण्याच्या दृष्टीने तरुण, उत्साही व विविध क्षत्रातील समाज बाधवांची बांधणी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे. संचालन व आभार जिल्हासचिव अविनाश नाकट पाटील यांनी केले. याप्रसंगी मराठा समाजातील विविध पदाधिकारी, मराठा सेवा संघ सलग्नित इतर कक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते.