महानगरात रंगले ब्रह्माकुमारीजचे शिव परमात्म्याचे भक्तिसंगीत
माउंट आबू येथील सतीशकुमार व नितीनभाईने गायली गीते
बुलडाणा, दि. 24 - प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अकोला द्वारे महानगरात शनिवारी सायंकाळी स्थानीय जानोरकर मंगल कार्यालयात एक शाम शिव परमात्मा के नाम या भव्य संगीत संध्येचे आयोजन करण्यात केले होते.या आयोजनात दूरवरून नागरिक महिला -पुरुषांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.स्थानीय केशव नगर परिसरातील जानोरकर मंगल कार्यालयात आयोजित या संगीत संध्या कार्यक्रमात ब्रह्माकुमारीज माउंट आबू चे संगीतकार राजयोगी ब्र.सतीशभाई यांनी शिव पार्मात्यावर आधारित संगीतमय गीते गाऊन वातावरण भक्तिमय केले.
यावेळी त्यांनी आपल्या मार्गदर्शनात भारताचा प्राचीन सहज राजयोग यावर विचार व्यक्त करून राजयोग हा सर्व जाती धर्माच्या महिला -पुरुषांना करता येणारा सोपा सरळ मार्ग असून या मार्गाने जीवन आनंदी होऊन शिव परमात्म्याची दिव्य अनुभूती होत असल्याचे प्रतिपादन केले.
ब्रह्माकुमारीजच्या अकोला-वाशीम प्रभारी रुक्मिणी दीदी यांच्या मार्गदर्शनात संपन्न या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी तेल्हारा ब्रह्माकुमारीजच्या संचालिका प्रमिला दीदी होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून माजी माजी महापौर सुमनताई गावंडे, माजी उपमहापौर विनोद मापारी, गुणवंतराव जानोरकर आदी मान्यवर उपस्थित होते
सर्वप्रथम मुस्कान या चिमुरडीच्या छान स्वागत गीत, दीप प्रज्वलन व स्नेहभेट प्रदानाने या रंगारंग कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.प्रास्ताविक अर्चना दीदी यांनी,संचालन वर्षा दीदी यांनी तर आभार सागरभाई यांनी मानलेत. ब्रह्माकुमारीजच्या वतीने महानगरातील सर्व ब्रह्माकुमारीजच्या शाखेत आगामी दि 23 एप्रिल ते 27 एप्रिल पर्यंत सकाळी 8 ते सकाळी 9 व साय.5-30 ते साय. साय.6-30 वा.पर्यंत अध्यात्मिक ध्यान व राजयोग शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.यावेळी सुमन दीदी, वैशाली दीदी समवेत ब्रह्माकुमारीज गांधी रोड,कीर्ती नगर,रामदास पेठ ,भारतीप्लॉट जुने शहर, पोस्टल कालोनी मलकापूर शाखेचे साधक व नागरिक महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.