काठमांडूहून दिल्लीला येत असलेल्या इसिसच्या संशयित दहशतवाद्याला अटक
काठमांडू, दि. 03 - नेपाळची राजधानी काठमांडूहून दिल्लीला येत असलेल्या इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली. अब्दुल लातिफ तासिन असे या संशियत दहशतवाद्याचे नाव तो इराणी नागरिक असल्याचे सांगण्यात येत आहे. तासिनला काठमांडूच्या त्रिभुवन विमानतळावरून अटक करण्यात आली. तासिनकडून अन्य कागदपत्रे जप्त करण्यात आली. पोलीस तासिनची कसून चौकशी करत आहेत.
