7.2 कोटी ग्राहकांनी घेतले रिलायन्स जिओचे ‘प्राईम’ सदस्यत्व
नवी दिल्ली, दि. 03 - रिलायन्स जिओचे 7.2 कोटी ग्राहकांनी ‘प्राईम’ सदस्यत्व घेतले आहे. 10 कोटीपेक्षा अधिक ग्राहक ‘प्राईम’ सदस्यत्व घेतील, असा दावा रिलायन्सजिओचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केला आहे. ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद पाहून मुकेश अंबानी यांनी ग्राहकांचे आभार मानले आहे.
कंपनीने जिओ प्राईम सदस्यत्व घेण्याच्या मुदतीत वाढ करत ही तारीख 15 एप्रिलपर्यंत केली आहे. कंपनीने प्राईम सबस्क्रायबर्ससाठी जिओ समर सरप्राईज ऑफरही सुरु केली आहे. यात 303 रुपयांचा प्लॅन घेतल्यास ग्राहकांना सुरुवातीचे तीन महिने मोफत सेवा पुरविण्यात येणार आहे.