Breaking News

महर्षी वाल्मिकी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राखी सावंतविरोधात अटक वॉरंट

नवी दिल्ली, दि. 03 - महर्षी वाल्मिकी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री राखी सावंतविरोधात अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश लुधियानाच्या एका न्यायालयाने दिली. गेल्या वर्षी टीव्ही चॅनेलवर एका कार्यक्रमादरम्यान महर्षी वाल्मिकी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करून वाल्मिकी समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप राखी सावंतवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी राखीवर तक्रार दाखल करण्यात आली.
अनेकदा समन्स बजावण्यात आले असूनही 9 मार्च रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान राखी हजर नव्हती. यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून राखीविरोधात अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी पुढील सुनावणी 10 एप्रिल रोजी होणार आहे.