Breaking News

पंजाबमध्ये ‘बीएसएफ’ने पाकिस्तानी घुसखोरांचा प्रयत्न हाणून पाडला

चंदीगड, दि. 03 - पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानी घुसखोरांचा प्रयत्न हाणून पाडला. सतुलज नदी मार्गावरून पाकिस्तानी घुसखोर नौकेतून मध्यरात्री घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानी घुसखो-यांवर गोळीबार केला. यानंतर घुसखोर तेथून फरार झाले. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन नौकासह अन्य साधन सामुग्री जप्त केली. सीमा सुरक्षा दलाचे जवानांनी आणि पोलिसांनी या भागात शोध मोहिम सुरू केली.