Breaking News

माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला - प्रशांत भूषण

नवी दिल्ली, दि. 03 - भगवान श्रीकृष्णबद्दलच्या माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला जात असल्याची प्रतिक्रिया स्वराज अभियानचे नेते आणि ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या रोड रोमियोविरोधी पथकावर केवळ मी माझे मत व्यक्त केले होते. धार्मिक भावना दुखावण्याचा माझा कोणत्याही हेतू नव्हता, असेही ट्विट भूषण यांनी केले.
रोमिओने फक्त एका महिलेवरच प्रेम केले. तर कृष्ण अनेक महिलांची छेड काढण्यात लोकप्रिय होते. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी रोड रोमियो विरोधी पथकाची स्थापना केली. या पथकाला कृष्णविरोधी पथक म्हणण्याची हिंमत आदित्यनाथ यांच्याकडे आहे का? असे वादग्रस्त ट्विट काल प्रशांत भूषण यांनी केले होते. भूषण यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.