Breaking News

योगी आदित्यनाथ यांच्या हिंदू युवा वाहिनीचे सदस्य होण्यासाठी दररोज 5 हजार अर्ज

लखनौ, दि. 03 - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यापासून योगी आदित्यनाथ यांच्या हिंदू युवा वाहिनीचे सदस्य होण्यासाठी दररोज 5 हजारांहून अधिक लोक अर्ज करत आहेत. यापूर्वी एका महिन्यात केवळ 500 ते 1 हजार इतकेच लोक अर्ज करत होते. मात्र योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर हिंदू युवा वाहिनीचे सदस्य होण्यासाठी दररोज 5 हजारांहून अधिक जण अर्ज करत असल्याची माहिती गोरखपूर मुख्यालयाच्या एका वरिष्ठ पदाधि-याने दिली.
2002 मध्ये योगी आदित्यनाथ यांनी हिंदुत्ववादी संघटनेची स्थापना केली होती. विशेष म्हणजे या हिंदू युवा वाहिनीत एकही महिला सदस्य नाही. या पूर्वी हिंदू युवा वाहिनीचे सदस्य होण्यासाठी कोणतेही नियम नव्हते. आता सदस्य होण्यासाठी काही नियम लागू करण्यात आले आहे.