Breaking News

शिक्षकांच्या विविध प्रश्‍नासंदर्भात चर्चा

अहमदनगर, दि. 27 - जिल्हा ज्युनिअर कॉलेज शिक्षक संघटनेच्या वतीने नाशिक पदवीधर मतदार संघाचे आ. डॉ.सुधीर तांबे यांच्याशी शिक्षकांच्या विविध प्रश्‍नासंदर्भात चर्चा करण्यात आली. शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू होण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली.
नाशिक पदवीधर मतदार संघामध्ये तीसर्यांदा बहुमताने निवडून आल्याबद्दल आ.डॉ.सुधीर तांबे यांचा, तर प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी रावसाहेब रोहोकले यांची निवड झाली असता जिल्हा ज्युनिअर कॉलेज शिक्षक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, शिक्षक नेते भाऊसाहेब कचरे, संजय शिंदे, सोपानराव कदम, प्रा.उत्तमराव गागरे, अमित खामकर, अमोल कांडेकर, प्रा.पवार, संजय शिंदे, विनायक कोके आदि उपस्थित होते.  प्रा.विधाते यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकित शिक्षकांच्या विविध प्रश्‍नावर चर्चा झाली. आ. डॉ.  तांबे यांनी  विनाअनुदानित व अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या  प्रश्‍नासंदर्भात  शासन स्तरावर झालेल्या चर्चेची माहिती दिली.