चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारताला धक्का, के.एल राहुल बाहेर
मुंबई, दि. 22 - इंग्लंडमध्ये होणार्या चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारताला धक्का बसला आहे. भारताचा ओपनर के.एल. राहुल हा चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. येत्या 1 जूनपासून इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पहिला सामना पाकिस्तानबरोबर 4 जूनला होणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिजवेळी राहुलच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. यानंतर 10 एप्रिलरोजी राहुलवर इंग्लंडमध्ये शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध राहुलनं 7 इनिंग्जमध्ये 6 हाफ सेंच्युरीसह 65.50 च्या सरासरीनं 393 रन्स बनवल्या होत्या. खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे राहुल आयपीएललाही मुकला आहे. दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या भारतीय संघामध्ये राहुलऐवजी शिखर धवनला संधी दिली जाऊ शकते.