Breaking News

वीरभद्र सिंग यांच्या फार्म हाऊसवर जप्ती

नवी दिल्ली, दि. 03 - आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आज सक्तवसुली संचलनयालयाने (ईडी) हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्या दिल्लीतील फार्म हाऊसवर जप्ती आणली. या फार्म हाऊसची किंमत सुमारे 27 ते 29 कोटी रूपये इतकी आहे. वीरभद्र सिंह यांची ‘ईडी’कडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू असून चौकशीदरम्यान ही कारवाई करण्यात आले आहे.
वीरभद्र सिंग यांचे जप्त केलेले फार्म हाऊस हे त्यांच्या मुलाच्या मालकीच्या असलेल्या ‘मॅपल’ कंपनीच्या नावावर आहे. हे फार्म हाऊसवीरभद्र सिंग यांनी 5.47 कोटी रूपयांची रोकड देऊन विकत घेतले असून अधिकृतरित्या या फार्म हाऊसची किंमत 1 कोटी दाखवण्यात आली आहे. हा पैसा वीरभद्र सिंग यांच्या बेहिशेबी मालमत्तेतील असल्याचा दावा ‘ईडी’ने केला आहे. दरम्यान, ही कारवाई राजकीय सुडापोटी करण्यात आल्याचा आरोप वीरभद्र सिंह यांनी केला आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय अन्वेषण विभागाने वीरभद्र सिंह, त्यांची पत्नी आणि अन्य नऊ जणांविरुद्ध आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे.