Breaking News

इराकमध्ये अडकलेले 33 भारतीय मायदेशी परतले

नवी दिल्ली, दि. 03 - इराकमधील इसिस या दहशतवादी संघटनेचा प्रभाव असलेल्या भागात अडकलेले 33 भारतीय आज मायदेशी परतले. भारतीय सरकारच्या मदतीने या 33 नागरिकांना मायदेशी आणण्यात यश आले. यातील 33 नागरिकांपैकी 32 नागरिक तेलंगणाचे तर 1 आंध्र प्रदेशचा असल्याची माहिती मिळत आहे. इराकच्या रबिल भागात भारतीय नागरिक अडकलेले होते. या भागात इसिसचे दहशतवादी सक्रिय आहे.