Breaking News

इराणकडून 15 भारतीय मच्छिमारांची सुटका

नवी दिल्ली, दि. 03 - मागील वर्षी बहरीन येथे नौकेसह पकडण्यात आलेल्या 15 भारतीय मच्छीमारांची इरानने सुटका केल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज दिली. सुषमा स्वराज यांनी ट्वीट  तामिळनाडूच्या मच्छीमारांना तीन नौकांसह पकडण्यात आले होते, आज या 15 मच्छीमारांची सुटका केली ही आनंदाची बाब आहे, असे ट्वीट स्वराज यांनी केले.यावेळी स्वराज यांनी तेहरान येथील भारतीय दुतावासाचेही आभार मानले आहेत.  मच्छिमार काही बहरिन नागरिकांसाठी काम करत होते. यावेळी परवानगी शिवाय इराणच्या सागरी हद्दीत प्रवेश केल्यामुळे त्यांना 22 ऑक्टोबर रोजी पकडण्यात आले होते.