अश्विन मुद्गल नागपूर पालिकेचे आयुक्त
श्वेता सिंघल सातारच्या नूतन जिल्हाधिकारी
सातारा, दि. 24 (प्रतिनिधी) : सातारचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांची नागपूर महापालिका आयुक्तपदी बदली झाली. त्यांच्या जागी मंत्रालयातील कामगार उपसचिव असलेल्या श्वेता सिंघल यांची सातारच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली.गेल्या 3 वर्षांच्या कालावधीत जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी जिल्ह्यात प्रभावी काम केले. जलयुक्त शिवार योजनेत त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे सातारा जिल्हा जलसंधारणासह इतर कामात नेहमीच आघाडीवर राहिला. सातार्यात त्यांनी केलेल्या कामाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमी घेत होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या नागपूर महापालिकेत आयुक्त पदी त्याची वर्णी लावली. त्यांच्या जागी श्वेता सिंघल यांची सातारच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती केली आहे. श्वेता सिंघल या 2009 च्या बॅचच्या आयएएस आहेत. त्या सध्या कामगार उपसचिव म्हणून कार्यरत आहेत. वंदना खुल्लर यांच्या नंतर सिंघल ह्या दुसर्या महिला जिल्हाधिकारी ठरणार आहेत. मूळचे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील निढल गावचे सुपुत्र चंद्रकांत दळवी यांची पुणे विभागाचे आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.