प्रत्येक कुटुंबाने स्री जन्माचे स्वागत करावे : जिल्हा परिषद उपाध्यक्षा राजश्री घुले
। मुलाला समाजात वंशाचा दिवा मानले जाते. पण, मुलगी ही तिच्या कतृत्वाने दोन्ही घरचा उद्धार करते
अहमदनगर, दि. 04 - मुलाला समाजात वंशाचा दिवा मानले जाते. पण, मुलगी ही तिच्या कतृत्वाने दोन्ही घरचा उद्धार करते. त्यामुळे, मुलीला वंशाची पणती न मानता वंशाचा दिवाच मानून प्रत्येक कुटुंबाने स्री जन्माचे स्वागत करावे, असे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्षा राजश्री चंद्रशेखर घुले यांनी केले. शेवगाव तालुक्यातील मठाचीवाडी येथे स्री जन्माचे स्वागतासाठी गावातील संस्कृती भाऊसाहेब करंजे या मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.या वेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी राजश्री घुले, पंचायत समितीच्या सभापतीपदी डॉ. क्षितीज घुले व पंचायत समिती सदस्यपदी मनीषा संजय कोळगे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात करण्यात आला. या वेळी माजी सभापती बाळासाहेब धोंडे, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, शेवगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष कृष्णा ढोरकुले, युवकचे तालुका कार्याध्यक्ष ताहेर पटेल, सरपंच सतीश धोंडे, अनिल मडके, मिलिंद कुलकर्णी, गुलाबराव घुले, सेवा संस्थेचे अध्यक्ष बबनराव जगदाळे, चाचा देशमुख आदी उपस्थित होते.
सौ. घुले म्हणाल्या, लोकनेते मारूतराव घुले यांनी सहकाराच्या माध्यमातून शेतकर्यांचे प्रपंच फुलवून शेवगाव तालुक्याचे नंदनवन केले. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आपण जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाची जबाबदारी सर्मथपणो यशस्वी करू. जयश्री व भाऊसाहेब करंजे या कुटुंबाची परिस्थिती गरिबीची असली तरी स्री जन्माच्या स्वागतासाठी त्यांनी मोठ्या आनंदाने मुलगी संस्कृती हिचा वाढदिवस साजरा केला आहे. एकविसाव्या शतकात महिला स्वकर्तृत्वाने प्रत्येक क्षेत्रात उच्च पदावर विराजमान झाल्या आहेत. त्यामुळे मुलीला मुलाप्रमाणोच वाढविले पाहिजे. समाजव्यवस्थेच्या रथाची स्री व पुरूष ही दोन चाके आहेत. करंजे कुटुंबाच्या कार्याचा आदर्श प्रत्येक कुटुंबाने घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. घुले, कोळगे, धोंडे, कुलकर्णी यांचीही या वेळी भाषणो झाली. या वेळी हरिश्चंद्र गुंड, भाऊसाहेब करंजे, गणोश जगदाळे, विष्णू जगदाळे, सोपानराव ढोरकुले, आबासाहेब वाघ, शिवाजी जरे, अण्णासाहेब करंजे, मच्छिंद्र म्हस्के, अश्पाक शेख, दत्तात्रय गमे, लक्ष्मण करंजे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.