Breaking News

बालहक्क आयोगाचे सचिव अ.ना.त्रिपाठी यांची सावलीस सदिच्छा भेट

अहमदनगर, दि. 21 - सावलीत सुधारगृहातील मुलांना नुसताच आधार मिळत नाही तर त्यांची शैक्षणिक प्रगती व कौशल्य विकसित केले जाते. भविष्यात त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहून नोकरीच्या मागे न लागता छोटे मोठे व्यवसाय करावेत यासाठी त्यांना स्वयंपाक, शेतीकाम, गोपालन, हातमाग, सूतकताई आदींचे सखोल प्रशिक्षण दिले जाते.
त्रिपाठी यांनी सावलीतील विविध उपक्रमांची माहिती मुलांकडून घेतली. त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधत त्या मुलांना काय हवे हे जाणून घेतले. याचवेळी स्वतःच्या मुलीच्या प्रतीक्षाच्या वाढदिवसानिमित्त त्रिपाठी यांनी मुलांना फळे दिली.
सुधारगृहातून सावलीत आलेल्या तीन मुलांचे पलायन की अपहरण याविषयी शंका असून गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असल्याने त्याचे अपहरण झाल्याची शंका यावेळी सावलीचे नितेश बनसोडे यांनी व्यक्त केली. तसेच लवकरच निवासी शाळा सुरु करण्याचा मानस व्यक्त केला. सावलीचे कार्य पाहता आता त्यांनी व्यसनमुक्तीसाठी चांगली मोहीम सुरु करण्याचे आवाहन श्री.त्रिपाठी यांनी केले. सावलीतील मुलांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अ.नगरच्या अधिकारी विजयमाला माने उपस्थित होत्या.