। सदर घटनेचा अहवाल जिल्हाधिकार्यांकडे सादर
अहमदनगर, दि. 21 - पोलिस ठाण्यातुन तिन वाळुच्या ट्रक गायब झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी संबधित ट्रक मालका विरुद्ध गुन्हे दाखल करावेत असे पत्र तहसीलदारांनी पोलिस निरीक्षकांना दिले.महसुल विभागाने फिर्याद देण्यासाठी माणुस पाठवा मी गुन्हा दाखल करतो अशा भुमिका पोलिस निरीक्षकांनी घेतली आहे. 7 एप्रिल 2017 रोजी महसुलच्या पथकाने पकडलेल्या तिन वाळुच्या ट्रक पोलिस ठाण्या समोरुन गायब झाल्या आहेत. याबाबत प्रांतअधिकारी प्रशांत खेडेकर यांनी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना अहवाल पाठविला असुन पोलिस निरीक्षकांनीच ट्रक सोडुन दिल्याचे म्हटले आहे. पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी त्या ट्रकमधील वाळु महसुलच्या स्थानिक कर्मचार्यांनी खाली करुन घेतली व त्यांनीच ट्रक सोडुन दिल्याचे म्हटले आहे. ट्रक सोडुन देणारे हे कर्मचारी नेमके कोण याचा तपास होण्याची गरज आहे. पोलिसांकडे संबधित वाहनांच्या चाव्या दिलेल्या नव्हत्या. आम्ही ट्रक सोडल्या नाहीत असे पोलिसांचे म्हणने आहे.गुरुवारी प्रभारी तहसीलदार जयसिंग भैसडे यांनी पोलिस निरीक्षकांना दुरध्वनी करुन संबधितावर गुन्हे नोदवावेत असे पत्र दिल्याचे सांगितले.पांडुरंग पवार यांनी महसुलचा कर्मचारी पाठवा मी तक्रार नोंदवुन गेतो असे सांगितले. वाळुच्या तिन ट्रक नेमक्या कोणी सोडुन दिल्या याचा तपास होवुन सत्य समाजासमोर आले पाहीजे.ट्रक सोडुन देण्याचे कारण काय.शासनाचा महसुल बुडाला याला जबाबदार कोण या प्रश्नांची उत्तरे आगामी काळात मिळतील.याबाबत बोलताना पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार म्हणाले, मी ट्रक सोडलेल्या नाहीत.संबधितांनी कोणतीही वस्तुस्थीती जाणुन न घेता सदर माहीती दिली आहे.सदर गाड्या परस्पर महसुल विभागाने सोडुन दिल्या आहेत.तसे सीसीटीव्ही फुटेज आहे. चुकीचा व दिशाभुल करणारा अहवाल पाठविला आहे.सदर प्रकाराबाबत न्यायलयीन लढा देणार आहे.