पनामा ; ‘जेआयटी’मार्फत नवाज शरीफ यांच्या चौकशीचे आदेश
इस्लामाबाद, दि. 21 - पनामा कागदपत्राप्रकरणी पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी न्यायालयाने संयुक्त तपास पथकामार्फत (जेआयटी) चौकशी करुन समितीने पुढील 60 दिवसांमध्ये अहवाल सादर करावा, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.या प्रकरणी नवाज शरीफ निर्दोष असल्याचे सक्षम पुरावे नसल्याचे न्यायालयाने दिलेल्या निर्णयात नमूद केले आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने 3-2 या बहूमताने शऱीफ यांच्या विरुद्ध निर्णय दिला आहे. पनामा कागदपत्रांप्रकरणी शरीफ आणि त्यांच्या आप्तेष्टांनी विदेशात अघोषित संपत्ती ठेवल्याचा आरोप ठेवण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने 23 फेब्रुवारी रोजी या प्रकरणी आपला निर्णय राखीव ठेवला होता.