Breaking News

भाजपचे सर्व मुख्यमंत्री दिल्लीत, मोदी, अमित शाहांसोबत बैठक

नवी दिल्ली, दि. 23 - भाजपशासित राज्यांचे सर्व मुख्यमंत्री आज दिल्लीत हजर राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व मुख्यमंत्र्यांना संबोधित करतील. पुढच्या महिन्यात मोदी सरकारला सत्तेत येऊन तीन वर्ष पूर्ण होणार आहेत. शिवाय राष्ट्रपती निवडणुकीबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
भाजपच्या केंद्रीय कार्यालयात संध्याकाळी 6 वाजता होणार्‍या या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह सर्व मुख्यमंत्र्यांना संबोधित करतील. बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, नगरविकास मंत्री व्यंकया नायडू, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, केंद्रीय परिवनहन मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती असेल. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात सरकार स्थापन केल्यानंतर यापूर्वी मुख्यमंत्र्यांची बैठक 27 ऑगस्ट 2016 रोजी झाली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारला तीन वर्ष पूर्ण होण्याअगोदर पुन्हा एकदा बैठक होत आहे. बैठकीत विविध विकास योजनांवर चर्चा केली जाणार आहे. भाजपने भुवनश्‍वरमध्ये झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतच 2019 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे.