Breaking News

दिल्ली महापालिकेसाठी आज मतदान, भाजप, काँग्रेस, आपमध्ये तिरंगी लढत

नवी दिल्ली, दि. 23 - दिल्ली एमसीडीच्या 270 वॉर्डसाठी आज मतदान होत असून, सकाळपासूनच सर्व मतदान केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी दिसून येत आहे. या महापालिका निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये तिरंगी लढत होत आहे.
एमसीडी महापालिकेत एकूण 272 वॉर्ड आहेत, मात्र दोन वॉर्डमधील उमेदवारांच्या निधनाने या प्रभागातील निवडणुक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. आजच्या मतदान प्रक्रियेत जवळपास 1 कोटी 32 लाख मतदार 2315 उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. या निवडणुकांचे निकाल 26 एप्रिल रोजी जाहीर होणार आहेत. दरम्यान, या निवडणुक प्रक्रियेसाठी मतदान हे ईव्हीएम मशीनद्वारेच होणार असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त एस.के.श्रीवास्तव यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच एकूण 468 केंद्र अतिसंवेदनशील असल्याचं घोषित केलं आहे.