Breaking News

उत्तर प्रदेशात कुपोषणामुक्तीसाठी ‘शबरी संकल्प अभियान’

लखनऊ, दि. 23 - उत्तर प्रदेशातील कुपोषणाची समस्या नष्ट करण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकार ‘शबरी संकल्प अभियान’ सुरु करणार आहे. 100 दिवसांमध्ये या अभियानाचा विकास आराखडा तयार करण्यात येणार असून त्यानंतर हे अभियान राबवण्यात येईल. येत्या पाच वर्षात उत्तर प्रदेशला कुपोषण मुक्त करण्याच्या दिशेने वाटचाल करण्यात येणार आहे. यासाठी लवकरात लवकर याचा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकार्‍यांना दिले आहेत. बालकांमधील कुपोषणाची समस्या नष्ट करण्यासाठी बालकांना पोषक आहार आणि पोषक वातावरणाची गरज आहे. उत्तर प्रदेशातील महिला आणि बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी महिला, बालकांच्या आरोग्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक ते निर्णय घेण्यात येतील,असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.