Breaking News

एअर इंडियाची वरिष्ठ नागरिकांना विशेष सूट

नवी दिल्ली, दि. 22 -  विमान कंपनी एअर इंडिया प्रवाशांसाठी नेहमी नवीन योजना घेऊन येते. आताही एअर इंडियाने प्रवाशांसाठी नवीन योजना घोषीत केली आहे. त्यानुसार एअर इंडियाने वरिष्ठ नागरिकांची वयोमर्यादा कमी केली आहे. याआधी वरिष्ठ नागरिकांची वयोमर्यादा 63 वर्षांची होती. आता ती 60 वर्षांपर्यत केली आहे. त्यामुळे आता 60 वर्षांच्या व्यक्तींनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार या योजनेतून 60 वर्षावरील सर्व प्रवाशांना तिकिटामध्ये 50 टक्के सूट मिळणार आहे. परंतू ही सूट फक्त देशांर्तगत प्रवासासाठीच असणार आहे. या योजनेचा लाभ घेणार्‍या प्रवाशांना ओळखपत्र आणि वरिष्ठ नागरिकत्वाचे प्रमाणपत्र सोबत ठेवावं लागणार आहे.