Breaking News

कूपर परिवारातर्फे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी साडेआठ लाखाची पुस्तके भेट


सातारा, दि. 28 (प्रतिनिधी) : कूपर उद्योग समूहातर्फे नुकताच सामाजिक दायित्व योजना अंतर्गत सातारा तालुक्यातील आठ विभागात 256 शाळांमध्ये विशेष शिक्षकांसाठी निवडलेल्या 6200 पुस्तकांचे भेट देण्यात आले. 
20 एप्रिल रोजी जिल्हा परिषद सातारा येथे मुख्य सभागृहामध्ये कूपर उद्योग समूह अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक फरोख कूपर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि कूपरचे कॉरपोरेट हेड एच. आर. आणि अ‍ॅडमिन नीतिन देशपांडे यांच्या हस्ते हा पुस्तक प्रदान सोहळा झाला.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना कूपर म्हणाले, ज्या ठिकाणी वाढले, लहानाचे मोठे झालो, त्याच मातीशी संलग्न राहून विकास करावयाचा ध्यास ठेवून कूपर परिवारातून अनेक सोशल प्रोग्राम्स कार्यान्वित होतात. सातारा तालुक्यात आठ विभाग 256 शाळांच्या शिक्षकांसाठी प्रत्येक विभागासाठी पाच संच, 770 पुस्तके दिली आहेत. समाजात नवीन निर्मिती घडविण्याचे काम, शैक्षणिक क्षेत्राचे कणा म्हणून शिक्षक काम करतात. आम्हाला सातारा तालुक्यातील शाळांना मदत करताना खूप आनंद झाला आहे. नवीन पिढीच्या जडणघडणीत खारीचा वाटा उचलण्याचे काम कूपर उद्योग समूह सामाजिक जबाबदारी योजनेअंतर्गत ही मदत करत आहे.