Breaking News

संजीवनी कार्यस्थळावर गुरूचरित्र पारायण सोहळा सांगता

अहमदनगर, दि. 26 - संजीवनी उद्योग समुह व सांस्कृतिक मंडळाच्या सहकार्याने सालाबादप्रमाणे याही वर्षी कारखाना कार्यस्थळावर श्री स्वामी समर्थ (अक्कलकोट) यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधुन गुरूचरित्र सामुदायिक पारायण सोहळयाचे आयोजन करण्यांत आले होते त्याची सांगता संचालक ज्ञानेश्‍वर भगवंता परजणे व त्यांच्या सुविद्य पत्नींच्या हस्ते करण्यांत आली. पारायणांचे हे चैाथे वर्ष होते यासाठी 113 पारायणार्थी बसले होते.  उपस्थित भाविकांना यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यांत आले.
श्री गुरूचरित्र पारायण सोहळया दरम्यान श्री स्वामी समर्थ सेवेकरी व प पू मोरेदादा यांच्या शिष्या श्रीमती पुष्पाताई गुरसळ यांनी उपस्थित भाविकांचे शंका निरसन करून पुर्ण सप्ताहभर हितगुज केले. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व आमदार स्नेहलता कोल्हे यांनीही भेट दिली.  प्रभारी कार्यकारी संचालक शिवाजीराव दिवटे      सुर्यवंशी, विधीज्ञ तुळशीराम कानवडे, प्रकाश डुंबरे, एस सी चिने व त्यांचे सर्व सहकारी यांनीही सप्ताहकाळात कार्यक्रम यशस्वीततेसाठी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे संचालक ज्ञानेश्‍वर परजणे म्हणांले की स्वामी समर्थ परिवारात भक्तीची मोठी ताकद असून जगाच्या कल्याणासाठी स्वामींनी सांगितलेल्या मार्गाक्रमणांवर त्यांचा सतत ध्यास असतो.