Breaking News

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोहानिमित्त मुस्लिम समाजाच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन

अहमदनगर, दि. 26 - विश्‍व वंदनीय भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर जयंती समारोहानिमित्त गुरुवार दि. 27एप्रिल रोजी येथील सय्यद बाबा चौक, मैदानात राष्ट्रीय जनक्रांती परिषद महाराष्ट्र लघुवृत्तवत्र व पत्रकार संघ सामाजिक समतामंच्, स्वतंत्र मजुर युनियन यांच्या संयुत विद्यमानाने व मुस्लिम समाजाच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुस्लिम  व अल्पसंख्यांक समाजाबद्दल योगदान या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजीत करण्या आला असून त्याचे  व्याख्याते म्हणून डॉ. जाकीर पठाण, पंडितराव बोर्डे, इम्तियाजभाई पिरजादे, सलीम इनामदार, आदि उपस्थित राहणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल मा. अविनाशजी आदिक यांचा नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष बरकतअली शेख, व विनायकराव निकाळे यांनी दिली आहे.
सदर कार्यक्रमाचे उदघाटन श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार भाऊसाहेब कांबळे हे भुषविणार आहेत. तर  बावीस्कर साहेब डी.वाय.एस.पी श्रीरामपूर विभाग, सह.उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिलकुमार बस्ते, पोलिस निरिक्षक प्रविणकुमार लोखंडे, पंचायत समितीचे सभापती दिपक पटारे, नगरसेवक अंजूमभाई शेख, अ‍ॅड.मन्सूर जहागीरदार, उपअभियंता श्रीरामपूर टि.एच गायकवाड, विजयराव खाजेकर व इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या व्याख्यानाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन अमीर जहागिरदार, रामोहंमद शेख, भाऊसाहेब खरा, विठ्ठल गोराणे, बी.के सौदागर, सरवरअली सय्यद,असलम बिनसाद, अय्युबभाई इनामदार,शेख फकीर मोहंमद यांनी केले आहे.