आयपीएल : सर्फराझच्या जागी बंगळुरू संघात हरप्रीत सिंग बाठीया
बंगळुरू, दि. 21 - ‘आयपीएल’ स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात दुखापतग्रस्त सर्फराझ खानच्या जागी बंगळुरू संघ व्यवस्थापनाने मध्य प्रदेशाचा फलंदाज हरप्रीत सिंग बाठीया याला करारबद्ध केले आहे. उर्वरित आयपीएलसाठी तो बंगळुरू संघाचा घटक असणार आहे. हरप्रीतने स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत चार सामन्यात 52च्या सरासरीने 211 धावा करूनही फेब्रुवारीमध्ये झालेल्या ‘आयपीएल’ लिलाव प्रक्रियेत हरप्रीतला कोणीही विकत घेतले नव्हते. नामसाधर्म्यामुळे तो ‘अनसोल्ड’ राहिला असल्याचे मत व्यक्त करण्यात येत होते. काही दिवसांपूर्वी 19 वर्षाखालील भारतीय संघातील क्रिकेटपटू मद्यधुंद अवस्थेत चारचाकी गाडी रेल्वे फलाटावर घेऊन आला होता. त्याचे नाव हरमीत सिंग असे होते, मात्र लिलावप्रक्रियेदरम्यान हरप्रीत आणि हरमीत नावांमधील गोंधळामुळे कोणत्याही संघ मालकाने हरप्रीतला विकत घेण्यात रस दाखवला नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
दरम्यान, हरप्रीतला करारबद्ध केल्यानंतर सर्फराझचे बंगळुरू संघात परतण्याचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत.