ओंड जिल्हा परिषदेच्या ओंड केंद्र शाळेला आयएसओ मानांकन
कराड, दि. 3 : दर्जेदार प्राथमिक शिक्षणाबरोबरच शैक्षणिक साहित्यांची उपलब्धी करुन विद्यार्थ्यांना परिपुर्ण शिक्षणाची सुविधा निर्माण केल्याने कराड तालुक्यातील ओंड येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेस नुकतेच आयएसओ मानांकन प्राप्त झाले. खाजगी शाळांपेक्षा आधुनिक शैक्षणिक सुविधा निर्माण झाल्याने त्यातच आयएसओ मानांकन प्राप्त झाल्याने या ज्ञानमंदिरात प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल दिसू लागला आहे.
ओंड, ता. कराड येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेस ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले. या मानांकन प्रमाणपत्राचे वितरण कराड पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समिती सभापती डॉ. सुरेखा शेवाळे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी आयएसओ कमिटीचे विभागप्रमुख रुपलग, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, विस्तार अधिकारी विश्वनाथ गायकवाड, आनंद पळसे, जमिला मुलाणी, पंचायत समिती सदस्य सोमनाथ जाधव, जिल्हा परिषद सदस्या विद्याताई थोरवडे, विजयमाला जगदाळे, राजकुमार पवार, शामबाला घोडके, पंचायत समिती सदस्य राजेंद्र बामणे, लक्ष्मण जाधव, सौ. भाग्यश्री पाटील, विनोद जाधव, प्रकाश वास्के, सौ. वर्षा पाटील, सौ. राजश्री थोरात, सौ. रुपाली यादव, भाऊसाहेब चव्हाण आदींसह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये संस्कारक्षम व आदर्श व्यक्तीमत्वाचे विद्यार्थी घडत असून ज्ञानरचनावादावर आधारित शिक्षण पध्दतीच्या अवलंबामुळे विद्यार्थ्यांना परिपुर्ण शिक्षण मिळत आहे. खाजगी शाळांपेक्षा आता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा दर्जा उंचावलेला दिसून आल्याने आता या शाळांमध्येच प्रवेश घेण्यासाठी पालक प्रयत्न करत आहेत.
शाळेची सुसज्ज इमारत, डिजीटल क्लासरुम, नवनवीन उपक्रम, अद्यावत प्रयोगशाळा व वाचनालय, निर्सगम्य परिसर आणि प्रशस्त क्रीडांगण, गुणवत्तापुर्ण शिक्षण, अनुभवी तज्ज्ञ शिक्षकांकडून ज्ञानदान आदींसह आधुनिक शैक्षणिक साधने असलेल्या या शाळेच्या आयएसओ मानांकनासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी, पालक व मुख्याध्यापक संपतराव साकुर्डे यांच्यासह सर्व शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक व माजी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.