Breaking News

दिवाणी न्यायाधीशपदी अ‍ॅड. स्नेहल निकम

उंब्रज, दि. 3 (प्रतिनिधी) : इंदोली, ता. कराड येथील अ‍ॅड. स्नेहल निवासराव निकम यांनी दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) व न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या परीक्षेत यश संपादन केले आहे. स्नेहल निकम ही कोयना दूध संघाचे माजी चेअरमन निवासराव निकम यांची कन्या आहे. स्नेहल हिने बी. एस. एल. एल. एल. बी., एल. एल. एम. चे शिक्षण आय. एल. एस. लॉ कॉलेज पुणे येथे पूर्ण केले असून बी. ई. आव्हाड लॉ क्लासेस पुणेचे अ‍ॅड. गणेश शिरसट यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले.