Breaking News

अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ला, भारताकडून तीव्र निषेध

नवी दिल्ली, दि. 24 - दहशतवाद संपवण्यासाठी भारत अफगाणिस्तानच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिल, असं आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांना पत्र पाठवून दिलं आहे.
शुक्रवारी अफगाणिस्तानमधील मजार-ए-शरीफवर झालेल्या हल्ल्यातील जखमींना प्रत्येक प्रकारची मदत देण्याचं आश्‍वासन मोदींनी दिलं. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी याबाबत माहिती दिली. उत्तर अफगाणिस्तानमधील या दहशतवादी हल्ल्यात 100 पेक्षा अधिक सैनिक मृत्यूमुखी पडले आहेत. तर अनेक जण जखमी झाले. भारताने या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात 100 पेक्षा अधिक जवानांचा मृत्यू झाला. हल्ल्यापूर्वी अनेक सैनिक नमाजसाठी गेले होते, अशी माहिती अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली.