उसने घेतलेल्या पैशाच्या वादातून तरुणाचा खून
पुणे, दि. 21 - जेजुरी रेल्वेस्टेशन नजीक साईमंदिरालगत मंगळवारी (दि.18 ) झालेल्या हरिष योगेश्वर निमजे वय -32, या तरुणाच्या खुनाचे गूढ पोलिसांनी उकलले असून या घटनेतील आरोपी शेखर उर्फ चिम्या वसंत माने रा.रेल्वेस्टेशन जेजुरी यास चंदननगर, पुणे येथून सापळा लावुन ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. शेखर माने याचेवर भा.द.वि.कलम 302 कलमान्वये गुन्हा दाखल करून सासवड न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हरिष निमजे याचा भाऊ सागर योगेश्वर निमजे रा.सासवड, कोडीत नाका ता.पुरंदर यांनी घटना घडली त्या दिवशी अज्ञात आरोपीच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती .
याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितलेली हकीकत अशी की, हरिष निमजे हा गेली 6 ते 7 वर्षापासून जेजुरीत वास्तव्यास असून तो शेखर वसंत माने यांचेकडे काम करतो तसेच त्याचे आणि माने परिवाराचे मित्रत्वाचे आणि सलोख्याचे नाते होते. माने यांचे घरी तो रोज जेवणखान करण्याकरिता जात असे त्याचेकडून शेखर माने याने 3500 रुपये उसनवारीने घेतले होते. परंतु आर्थिक अडचण असल्याने शेखर माने वेळेत पैसे परत देवू शकला नव्हता तर हरिष पैसे मागताना वाद घालून भांडण तंटा व शिवीगाळ करीत होता. मंगळवारी (दि.18 )सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हरिष याने शेखर मानेच्या घरी जावून पैशाची मागणी केली परंतु शेखर कडे पैसे नसल्याने दोघांमध्ये वाद झाला यावेळी घरासमोर पडलेला कोयता उचलून शेखरने हरिष निमजेच्या मानेवर वार केला. एकाच वाराने हरिष खाली पडलेला पाहून शेखर मानेने तेथून स्वत:च्या दुचाकीवरून पलायन केले. नाझरे जलाशयात हत्या करताना वापरलेला कोयता टाकून दिल्याचे आरोपी शेखर माने याने चौकशीचे वेळी पोलिसांना सांगीतले आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत देव, पोलीस कर्मचारी रणजीत निगडे, आप्पा पड्याळ, योगेश बळीप यांनी आरोपीचा माग काढत घटना घडल्यानंतर केवळ 24 तासामध्ये त्याला अटक केले.