Breaking News

राज्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंसह क्रीडा मार्गदर्शकांना रोख बक्षिसे

सातारा, दि. 28 (प्रतिनिधी) : विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील 53 पदक प्राप्त खेळाडू व त्यांचे  क्रीडा मार्गदर्शकांसाठी रोख बक्षिस निधी मंजूर झाला आहे. ही मंजूर बक्षिसाची रक्कम संबंधित खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शकांच्या बँक खात्यात आरटीजीएस, एनइएफटीद्वारे वर्ग करण्याची कार्यवाही संचालनालयास्तरावर सुरु आहे. 
एप्रिल 2017 अखेर सर्व संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. सन 2017-18 या आर्थिक वर्षातील विविध अधिकृत आंतरराष्ट्रीय खेळांच्या अधिकृत संघटनाच्या वयोगटातील खेळाडूंनी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे प्राविण्य प्राप्त केले असल्यास  आपले खेळाचे प्रमाणपत्र तसेच संबंधित राज्य, राष्ट्रीय खेळ संघटनाच्या शिफारशीसह रोख बक्षिस पारितोषिकासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरुन व अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा किंवा आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन आर. आर. माने आयुक्त क्रीडा व युवक सेवा, पुणे यांनी सांगितले.