Breaking News

फ्लिपकार्टची नो रिफंड पॉलिसी मागे!

मुंबई, दि. 27 - फ्लिपकार्टने नो रिफंड पॉलिसी मागे घेतली आहे. ग्राहकांची संख्या कमी होत असल्याच्या चिंतेने कंपनीने काही लोकप्रिय श्रेणीमध्ये ही पॉलिसी पुन्हा लॉन्च केली आहे. फ्लिपकार्टने वेबसाईटवरुन खरेदी केलेली उत्पादनं परत करण्याच्या मोबदल्यात रिफंड देणं नुकतंच बंद केलं होतं.
पण कंपनीच्या या निर्णयामुळे ग्राहकांना आता पुस्तकं, होम हेकॉर अँड लाईफस्टाईल, फॅशन प्रॉडक्ट्स, फिटनेस इक्विपमेंट, म्युझिक इन्स्ट्रुमेंटसह इतर उत्पादनांवर आता रिफंड मिळवू शकतात. याआधी ग्राहक ही उत्पादनं केवळ रिप्लेस करु शकत होते.
मात्र कंपनी आताही मोबाईल फोन, फर्निचर, एअर कंडिशनर, वॉशिंग मशिन, टेलिव्हिजन यांसारख्या मोठ्या अप्लायन्स आणि स्मॉल अप्लायन्ससारख्या दुसर्‍या लोकप्रिय कॅटेगरीतील उत्पादनांवर रिफंड देत नाही. परंतु कंपनीच्या प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, फ्लिपकार्टची रिटर्न पॉलिसी फारच कस्टमर फ्रेण्डली आहे. एक वर्षांच्या काळात कंपनीच्या रिटर्न पॉलिसीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आमच्या ग्राहकांनी कायमच फ्लिपकार्टवर कोणत्याही अडचणीशिवाय रिटर्न एक्स्पीरिअन्सचा लाभ घेतला आहे. पण सत्य परिस्थिती अशी आहे की, ग्राहक फ्लिपकार्टवर 1800 कॅटेगरींपैकी सुमारे दोन तृतीयांशसाठी थेट वेबसाईटद्वारे रिफंडचा आग्रह करु शकतात.