कराडमधून चोरलेले एटीएम मशीन म्हसवडजवळ सापडले
कराड, दि. 4 (प्रतिनिधी) : कराड तालुक्यातील मलकापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील एटीएम मशीन एक महिन्यापूर्वी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. ते मशीन दहिवडी ते म्हसवड मार्गावर धामणे फाट्यावरील माळरानावर म्हसवड पोलिसांना आढळून आले. हे एटीएम मशीन कराड शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर नगरपंचायतीच्या हद्दीत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मलकापूर शाखेत एटीएम सुरू होते. हे एटीएम मशीन मार्च 2017 मध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. मशीनमध्ये लाखो रुपयांची रोकड असल्याची माहिती पोलिसांकडे नोंद आहे. एटीएम मशीन चोरट्यांनी पळवून नेल्यामुळे कराड व मलकापूर परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. एक महिन्यापासून कराड शहर पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा एटीएम चोरट्यांचा शोध घेत होते. मात्र चोरटे अथवा चोरीस गेलेली एटीएम मशीनचा शोध लागला नव्हता. अखेर दोन दिवसापूर्वी दहिवडी ते म्हसवड मार्गावर धामणे फाट्यावरील माळरानात मोडतोड केलेल्या अवस्थेत एटीएम मशीन पडले असल्याची माहिती म्हसवड पोलिसांना मिळताच घटनास्थळी सपोनि सुनील चव्हाण व कर्मचार्यांनी जावून पाहणी केली. त्यावेळी मलकापूर (कराड) येथून चोरीला गेलेले एटीएम मशीन असल्याची खात्री पटली. तातडीने कराड शहर पोलिसाशी संपर्क साधल्यानंतर कराडच्या गुन्हे शाखेच्या कर्मचार्यांनी म्हसवड येथे जावून ते रिकामे मशीन पंचनामा करून ताब्यात घेतले. मशीनमध्ये रक्कम ठेवण्यासाठी असलेला बॉक्स खोलून त्यातील सुमारे दीड लाखाची रक्कम चोरट्यांनी लांबवून ते मशीन फेकून दिले आहे. कराडातून चोरीस गेलेले एटीएम मशीन म्हसवडजवळ सापडल्यामुळे चोरटे त्या परिसरातील असावेत, असा संशय व्यक्त करून पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु आहे.