तुकाराम मुंढेंनी केले ऑन ड्युटी झोपलेल्या कर्मचार्यांचे निलंबन
पुणे, दि. 04 - रोज एका नव्या निर्णयाचा धडाका पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदाची सुत्रं हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी लावला आहे. मुंढेंनी ऑन ड्युटी झोपा काढणार्या नऊ कर्मचार्यांचे निलंबन केले आहे.
शनिवारी रात्री भरारी पथकाला पुणे स्टेशन आणि कोथरुड डेपोमध्ये गाडयांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामावर असलेले 9 कर्मचारी झोपल्याचे आढळून आले. मात्र ही डुलकी या कर्मचार्यांना महागात पडली असून या 9 कर्मचार्यांना निलंबित करण्याचे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
शहरात एकूण 13 डेपो असून रात्रीच्या वेळेत झोपणार्या कर्मचार्यांवर कारवाईचे आदेश तुकाराम मुंढे यांनी प्रशासनास दिले होते. त्यासाठी चार कर्मचार्यांचे पथक नेमण्यात आले होते. या भरारी पथकाला कोथरुड आणि पुणे स्टेशन आगारातील 9 कर्मचारी झोपलेले आढळून आले. निलंबित कर्मचार्यांमध्ये दोन बसचालक असून 7 गाडयांची दुरुस्ती करणार्या वर्कशॉप मधील कर्मचार्यांचा समावेश आहे.