सातार्यात सायन्स महाविद्यालयातील 50 वर्षापूर्वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
सातारा, दि. 3 (प्रतिनिधी) : महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर स्वत:चे उज्ज्वल भवितव्य घडवलेले ते एकाहून एक कर्तृत्त्ववान विद्यार्थी जेव्हा 50 वर्षांनी आपल्या शाळेच्या आणि सवंगड्यांच्या भेटीच्या ओढीने एकत्र जमले, तेव्हा ती शाळाही कृतकृत्यतेच्या भावनेने मोहरून गेली.
रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी कॉलेजमध्ये सायन्स शाखा सन 1958 ला सुरु झाली. त्यानंतर 1964-65 ला स्वतंत्र सायन्स कॉलेजची स्थापना झाली. त्याचेच रुपांतर सन 1972 मध्ये यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये झाले. सायन्स कॉलेजचे पहिले प्रिन्सिपॉल डॉ. बी. एस. पाटील होते. स्थापना झाल्यापासून आजतागायत सायन्स कॉलेजने अतिशय वेगाने उन्नति करुन हजारो विद्यार्थ्यांना उत्तम प्रतिचे शिक्षण दिले आहे. सध्याचे प्रिन्सिपॉल डॉ. के. जी. कानडे आहेत.
सन 1965-67 साली पदवी घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून ते साजरे करावे व त्यानिमित्ताने एकमेकांना भेटावे या उद्देशाने त्यातीलच एक विद्यार्थी एअर कमोडर सुहास मोहिते यांनी पुढाकार घेऊन सुवर्ण महोत्सव साजरा करण्याची कल्पना प्रिन्सिपॉल कानडे यांच्यापुढे मांडली. कानडे व त्यांचे सहकारी यांनी उत्तम प्रतिसाद दिला. तसेच माजी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकार्यांनी सहकार्य दिले.
मोहिते यांनी प्रयत्नपूर्वक माजी विद्यार्थ्यांचे सध्याचे पत्ते, फोन नंबर शोधून त्यांच्याशी संपर्क साधला. विशेषत: सत्तरी ओलांडलेल्या या विद्यार्थ्यांनी उत्साहाने येण्याचे कबूल केल्याने हा कार्यक्रम साजरा करणे शक्य झाले. या कार्यक्रमाचा उद्देश एकमेकांना भेटणे तसेच आपापल्या कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा देणे हा होता.
या विद्यार्थ्यांच्या गेल्या पन्नास वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेतला असता लक्षात येते, की त्यातील अनेक जणांनी शिक्षण क्षेत्रात ज्ञानार्जनाचे कार्य करुन नवीन पिढीला उत्तम मार्गदर्शन केले आहे. त्यातील अनेक जणांनी प्राध्यापक, प्रिन्सिपॉल, व्हाइस चॅन्सलर इत्यादी पदे भूषविली आहेत. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील हेदेखील याच बॅचचे विद्यार्थी आहेत. शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त डॉक्टर्स, इंजिनिअर्स, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, संरक्षण क्षेत्रात, कर्नल, एअर कमोडर, कमांडर इत्यादी विविध पदे काहींनी भूषवली आहेत. त्यामध्ये सातार्यातीलच कूपर इंडस्ट्रीजचे चेअरमन फरोख कूपर यांचाही समावेश आहे. काहीजणांनी खेळ व सिनेक्षेत्रातही नाव कमवले आहे. सर्व यशाचे श्रेय हे विद्यार्थी त्यांना मिळालेल्या उत्तम शिक्षणाला देत आहेत.