परदेशी पर्यटकांनी घेतले लिंगेश्वराचे दर्शन
अकोले, दि. 24 - लिंगदेव येथील लिंगेश्वर देवस्थान येथील संगित आखाडीचे गुढीपाडव्याला आयोजन करण्यात येते. या संगित आखाडी विषयी एक उत्सुकता असल्याने व या लोककलेचा अभ्यास करण्यासाठी ए.जेसान हे अमेरीकेतील असुन ते व नॉन सि च्यांग या चीन येथिल असुन भारतातील ग्रामीण भागातील लोककला अभ्यास करण्यासाठी, भारतातील संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी भारतात आले होते व त्यांनी लिगदेव येथे आल्यानंतर ग्रामस्थांकडुन लोक संगीताच्या विषयीची माहिती जाणुन घेतली.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने देवस्थानचे अध्यक्ष डी. बी. फापाळे यांनी विदेशी पाहुण्याचे स्वागत केले. पाहुंण्याच्या फेटा व नारळ देऊन सत्कार करण्यात आला. या आगळ्या वेगळ्या सत्काराने विदेशी पाहुणे भारावुन गेले.
याविषयी अमेरीकेचे ए. जेसान म्हणाले की भारत देश व भारत देशातील संस्कृती, शेती, लोककला या विषयी लहान असल्यापासून आकर्षण होते आज भारतातील ग्रामीण भागातील शेती, लोककला, मंदिरे पाहून आज भारावून गेलो आहोत.
चिन मध्ये कोणत्याही प्रकारे भारताबद्दल वाईट भावना नसुन भारताबद्दल आकर्षण व आपुलकीची भावना आहे भारतात प्रवास करताना रस्ते माञ व्यवस्थीत आहेत. कोणत्याही देशाची प्रगती रस्त्यावर अवलंबून असते. भारतातील डोंगरदर्या, निसर्ग व ज्युन्या पांडव ,यादव कालीन मंदिरे हे भारतातील वैभव आहे असे मत नॉन सि च्यांग या महिलेने व्यक्त केले. यावेळी लिंगदेव गावातील असंख्य अमित घोमल, महेश फापाळे, बन्सि कानवडे, गणेश सुर्यवंशी, प्रभाकर फापाळे, सुरेश कानवडे, जिजाबा कानवडे उपस्थित होते.