अवैध दारु विक्री थांबली; वाळूतस्करी सुरुच
अकोले, दि. 24 - मुळा विभागात राजरोसपणे दैनंदिन कोट्यवधी रुपयांची वाळू तस्करी होत असून याकडे महसूल विभागाचे पुर्णपणे दुर्लक्ष आहे. या वाळूतस्करीमुळे या विभागातील शेतकर्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान होत असले तरी महसूल व पोलीस यंत्रणेच्या कृपा आशीर्वादाने हा व्यवसाय तेजीत बनला आहे. या भागातून कोटयावधी रुपयांची वाळूतस्करी जेसीबी, फोकलंडच्या सहाय्याने पुणे, अहमदनगर, मुंबई, नाशिक या भागात होत आहे.
मुळा विभागातील लिंगदेव, लहित, चास, कोतूळ, आंभोळ, पैठण, कोठे, घारगाव या भागातून ढंपरच्या सहायाने ही वाहतूक सुरु आहे. या वाळू उपशामुळे मुळा नदी पात्रातील पाण्याचा स्त्रोत कमी झाला. वाळूतस्करी करणारे हे विविध पक्षांचे लंगोटी कार्यकर्ते असून रात्रीतून करोडपती बनण्याचे या धंद्याचे वैशिष्ट आहे.
सोन्यापेक्षा वाळूला मोठा भाव मिळत असल्यामुळे या भागातील वाळू नदी पात्रातून सकाळ व रात्रीच्या वेळेस खुलेआमपणे सुरु आहे. ही वाळू शेतकर्यांच्या जमिनीतून यंत्राच्या सहाय्याने काढून विकली जाते. गेल्या तीन - चार वर्षापुर्वी या वाळू तस्करीमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. ज्यांचे प्राण गमवावे लागले त्या कुटुंबांना या वाळूतस्करांनी कोणतेही सहकार्य केले नाही.
माजी मंत्री पिचड यांनी या प्रशासनाच्या विरोधात अकोले तहसीलसमोर अधिकार्यांना खडेबोल सुनावून देखील कोणतीही कारवाई झाली नाही. उलट ‘रात गई बात गई’ या म्हणीप्रमाणे या अधिकार्यांवर कोणाचाही वचक राहिला नसून अशा निष्क्रिय अधिकार्यांची गडचिरोली, नागपूर विभागात बदली करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.
या विभागातील महसूल अधिकारी वाळू तस्करांबरोबर साटेलोटे असल्यामुळे खुलेआमपणे राज्यशासनाचा महसूल बुडवून हा व्यवसाय खुलेआमपणे सुरु आहे.
संगमनेर उपविभागीय अधिकारी यांच्याच विभागात हा व्यवसाय सुरु असला तरी कारवाई का केली जात नाही. मुळा विभागातील चास, लहित, लिंगदेव या भागातून हा व्यवसाय अनेकांना जीवनदान ठरणारा असला तरी अनेकांना जीव गमवावा लागत आहे. हे वाळूतस्कर या भागातील राजकारणी बनले असून तरुण पिढीला बिघडविण्याचे काम देखील याच मंडळींनी सुरु केले आहे.
या वाळूचा पैसा दारु, जुगार यासारख्या अवैद्य धंदे चालकांना पुरवठा करणारा असून अनेक तरुणांना बिघडविण्याचे काम सध्या या वाळूतस्करांकडून सुरु आहे. या भागातील अवैद्य वाळूतस्करी तातडीने बंद करावी.
या वाळूतस्करांवर अकोले महसूल विभागाने आत्तापर्यंत किती जणांवर कारवाई केली. कारवाई करताना ‘जखम गुडघ्याला मलम शेंडीला’ याप्रमाणे दंड हा नाममात्र असून पडद्यामागून सुरु असलेला चेरीमेरीचा प्रकार आता थांबेल का? पोलीस यंत्रणा देखील या वाळूतस्करांच्या सोबतीला असून या वाळूतस्करांवर तडीपारीचे प्रस्ताव करुन हा व्यवसाय बंद करावा अशी मागणी या भागातील कार्यकर्त्यांनी केली. ज्या ज्या ठिकाणी वाळूउपसा झाला त्या ठिकाणी पंचनामा करुन सबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशा आशयाचे निवेदन राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री राम शिंदे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे, प्रांताधिकारी भागवत डोईफोडे यांच्याकडे केली आहे.
तालुक्यातील शेकेईवाडी येथून नदीपात्रालगत मोठया प्रमाणात वाळूतस्करी होत असून त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येथील नागरिकांना भेडसावत आहे. वाळू उपसा झाल्यामुळे पाणी राहत नाही. अनेक वेळा नागरिकांनी नगरपंचायत, तहसीलदार यांच्याकडे तक्रारी केल्या. मात्र वाळूतस्कर व महसूलच्या संगनमताने सुरु असलेला व्यवसाय बंद होत नाही. संगमनेरचे उपविभागीय अधिकारी भागवत डोईफोडे यांनी शेकेईवाडी येथील वाळूतस्कराच्या मुसक्या बंद कराव्यात व मुळा भागातील आंभोळ, पैठण, शेलद, धामणगाव पाट या भागात देखील यंत्र सामुग्रीच्या सहाय्याने वाळू उपसा होतो. काही वाळूतस्करांनी शेतकर्यांच्या जमीनी उकरुन मशीनद्वारे वाळूउपसा सुरु केला आहे. रात्रीच्या वेळी कोटयावधी रुपयांची वाळू खुलेआमपणे सुरु असताना देखील अकोलेच्या महसूल विभागाला अद्यापही जाग आली नाही.
अनेकांनी याबाबत तक्रारी केल्या या तक्रारींची दखल थेट केराच्या टोपलीत दाखविली जाते. हा तालुका डाव्या चळवळीतला असून सत्ताधारी पक्षाने विकासाच्या जोरावर तीस वर्ष सत्ता ताब्यात ठेवली. मात्र गेल्या तीन वर्षांपासून केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आले. या कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस आले असले तरी विद्यमान अनेक वर्ष सत्ता भोगलेले सत्ताधारी पक्षाचे लंगोटी कार्यकर्ते या वाळू व्यवसायात आघाडीवर आहेत. तालुक्यातील प्रवरा, मुळा, आढळा, पठार भाग या वाळू उपशामुळे अनेक दिवसांपासून वैफल्यग्रस्त बनला आहे. कारवाई करावी अशी कोणी हाक मारली तरी या वाळूतस्करांकडून संबंधितांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते. नगर जिल्हयात नव्याने रुजु होणारी जिल्हाधिकारी यांना अवैद्य वाळूतस्करीला लगाम लावण्यासाठी पहिले पाऊल उचलावे लागेल. विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. अनिल कवडे यांच्या कार्यकाळात वाळूतस्करांना अभय मिळत असल्याची चर्चा होती. ही चर्चा बंद करण्यासाठी नगर जिल्हा महसूल प्रशासनाला कडक पाऊले उचलावी लागतील.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या कार्यकाळात नगर जिल्हयात अद्याप एकही बैठक झाली नाही. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात वाळूतस्करीला लगाम लावला होता. आता मात्र चंद्रकांत दादा पाटील या वाळूतस्करी बाबत काय कारवाई करणार याकडे अनेक दिवसांपासून लोकांनी केलेल्या तक्रारींबाबत विद्यमान जिल्हाधिकारी कारवाई करणार का? मुळा व शेकेईवाडी परिसरातील वाळूतस्करांवर कारवाई होईल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
राज्याचे विरोधी पक्ष नेते ना. विखे यांनी आश्वी येथे जनता दरबार घेवून वाळूतस्करी करणार्यांवर महसूलने तातडीने पाऊले उचलावी. जे अधिकारी कारवाई करण्यास दिरंगाई करतील त्यांना नगर जिल्हयातून हटविले जाईल. कार्यकर्त्यांनी वाळूतस्करांबाबत मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांची देखील आपण गय करणार नाही. मात्र आठ दिवस उलटून देखील विरोधी पक्ष नेत्यांच्या आदेशाला अद्यापही महसूल विभागाने कारवाई केलेली नाही. त्यामुळे नेते बोलतात अधिकारी ऐकतात, ‘रात गई बात गई’ या प्रमाणे संगमनेर, अकोले तालुक्यात कामकाज सुरु आहे असे दिसून येते. वाळू, मटका हा व्यवसाय एका रात्रीत मानसाला मोठे करण्याचे मोठे साधन असून या व्यवसायाकडे अनेक तरुणांचा कल दिवंसेदिवस वाढताना दिसतो. आता तरी या व्यवसायावर बंदी आली तर नक्कीच राज्याचा महसूल वाढू शकतो. रात्र दिवस वाळूचोरीचा व्यवसाय सुरु असल्यामुळे वाळूच्या ढंपरमध्ये रात्रीतून दारु सप्लाय केली जाते. वाळू तस्करांनी जोडीला दारुचे पार्सल वाहतूक हा नवा व्यवसाय सुरु केला आहे.