Breaking News

आठरे पाटील बालगृहातील मुलांसमवेत सण, उत्सव, वाढदिवस साजरे करण्याचा आनंद वेगळाच - कदम

अहमदनगर, दि. 03 - मानवता सेवा संस्था व ह्युमिनिटी केअर समाजामध्ये चांगले काम करीत असून, वंचित घटकांना मदत करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून या संस्थेने एमआयडीसीतील आठरे पाटील बालगृहास नित्योपयोगी वस्तुंची भेट दिली. सामाजिक भावनेतून ही संस्था काम करीत आहे. प्रत्येकानेच समाजातील वंचित घटकांना  मदत  करायला हवी, अशा उपक्रमांमुळे प्रेरणा मिळते. प्रत्येकानेच गोरगरीब घटकांसमवेत वाढदिवस साजरा करायला हवा. या बालगृहात आल्यानंतर खूप समाधान वाटले. यांच्यासमवेत सण, उत्सव साजरे करण्याचा आनंद काही वेगळाच असतो, असे प्रतिपादन शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम  यांनी केले.
 मानवता सेवा संस्था व ह्युमिनिटी केअरच्या वतीने शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांचा वाढदिवस नित्योपयोगी वस्तु देऊन साजरा करण्यात आला. यावेळी श्री. कदम बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, अविनाश कोतकर, अमोल व्यवहारे, तुषार शिंदे, विनोद गोंधळे, राजन झा, प्रशांत शिरसाठ, ऋषिकेश देवढे, विकी राऊत, विनय साळवे, दीपक चावरिया, राहुल नेटके, हरिष कळसे, प्रशांत मदने, बाळासाहेब कोतकर, आत्माराम खरमाळे, मयूर पाटोळे, संकेत पवार, महेश चेमटे, हेमलता कांबळे, सुनीता शिंगाडे, अमित वाकडे, सूरज पाचारणे, अर्जुन पाचारणे आदी उपस्थित होते.