महानगरपालिकेत दुषित पाण्याच्या कारवाईसाठी पथके नाहीत
। मनपा प्रशासन आरोग्य विभगाचेही दुर्लक्ष
अहमदनगर, दि. 03 - बर्फ कारखान्यातील पाणी व बर्फाचे नमुने तपासणीची मोहिम राबविण्यास महापालिकेकडून टाळाटाळ केली जात असून त्यासाठीची पथके अद्यापही प्रशासनाने नियुक्त केले नाहीत. यावरुन मनपा प्रशासनाता शहरातील नागरीकांच्या जिवीताशी खेळत असल्याच चित्र आहे. तर आरोग्य विभाग सुध्दा झोपल्याचे सोंग घेत असुन बर्फ कारखान्याकडे जाणीवपुर्व दुर्लक्ष करत आहे. नगरचा पारा जवळपास दोन दिवसात 38 अंशाच्या घरात गेला आहे. वाढलेल्या तापमानाचा जनजीवनावर परिणाम मोठ्या प्रमाणात झाला असून दुपारच्या वेळी शहरातील रस्ते निर्मनुष्य असल्याने एकप्रकारे अघोषित संचारबंदी असल्याचे जाणवते. बदलत्या वातावरणाने रूग्णांची संख्या वाढली आहे. त्यातच उन्हाच्या काहिलीमुळे नागरिक शीतपेयांचा आधार घेत आहेत. परंतु या शीत पेयामध्ये वापरण्यात येणारे पाणी व बर्फाचा दर्जाचा पालिकेकडून तपासला जात नसल्याने अनेक ठिकाणी बालके आजारी पडण्याची शक्याता निर्माण होत आहे.
उन्हाच्या तीव्रतेमुळे सध्या हॉटेल, रसवंतीगृह व शितपेयात बर्फाच्या वापराचे प्रमाण वाढले आहे. त्यातच पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याचे चिन्हे आहे. त्यामुळे या कारखान्यांमध्ये योग्य पाणी वापरले जाते का? दुषित पाण्यापासून बनविलेल्या बर्फापासून साथीचे आजार उद्भवण्याची शक्यता असल्याने बर्फ निर्मिती करणारे कारखाने बर्फ विक्री व व्यवसाय करणार्या ठिकाणाची तपासणी महापालिकेमार्फत करणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने पथकांची नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे. परंतु नगरकरांच्या हितसाठी अद्यापही दुषित पाण्याचा कारवाईसाठी कोणत्याही पथकांची नियुक्ती करण्यात आली नाही. आरोग्य विभागाचे त्याकडे दुर्लक्ष झाले असल्याने यातुन सर्वसामान्यांचे नुकसान होत आहे. पालिकेकडून अद्याप अशी कोणतीच कारवाई कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे हॉटेल, रसवंतीगृह व शितपेयात वापरले जाणारे बर्फाच्या पाणी योग्य आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे किंवा काही ठिकाणी पाणी दुषित असेल तर कारवाई का करण्यात आली नाही असा सवाल नागरीकांनी वचारला आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग केवळ नावालाच आहे की काय असे एक ना अनेक प्रश्न जाणकार नागरिकांकडून उपस्थित केले जात असून याची दखल आयुक्त दिलीप गावडे घेणार का ? तेरी भी चुप आणि मेरी भी चुप असाच बर्फ कारखान्यातील कारभार सुरु राहणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.