Breaking News

मेधा देशमुख-भास्करन यांच्या ‘झुंज नियतीशी’चेनगरला प्रकाशन

अहमदनगर, दि. 28 - नगरच्या असलेल्या लेखिका मेधादेशमुख-भास्करन यांच्या झुंज नियतीशी या पुस्तकाचे प्रकाशन येत्या 2 मे रोजी नगरला होणार आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर इंग्रजीतलिहिलेल्या ‘चॅलेंजिंग डेस्टिनी’ या पुस्तकाचा ‘झुंज नियतीशी’ हा मराठी अनुवादआहे. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने ‘आग्र्याहून सुटका’ या पुस्तकाचे लेखक डॉ. अजित जोशी, शिवकालिनशस्त्रास्त्र संग्राहक व अभ्यासक गिरीश जाधव, मंजुल पब्लिकेशन हाउसचे मुख्यसंपादक चेतन कोळी, लक्ष्मीकांत ढोरे आदी उपस्थित राहणार आहेत. तसेचइतिहास तज्ज्ञांकडून इतिहासातील दुर्मिळ व रंजक गोष्टींवर व्याख्याने होणार आहेत.
येत्या मंगळवारी 2 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नगर-कल्याण रोडवरीलभूषणनगर फाट्यावर असलेल्या ‘आयएमए’ भवनात झुंज नियतीशी या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.मेधा देशमुख-भास्करन यांनी दहा वर्षे परिश्रमघेऊन चॅलेंजिंग डेस्टिनी हे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांचे जीवनचरित्र व राज्यकारभाराची वैशिष्ट्ये देश विदेशातीलवाचकांपर्यंत पोचावीत, या हेतूने त्यांनी लेखन केले आहे. इंग्रजीतीलबेस्टसेलिंग पुस्तकांमध्ये या पुस्तकाचा समावेश आहे. या इंग्रजी पुस्तकाचामराठी अनुवाद इंद्रायणी चव्हाण यांनी केला असून, प्रकाशन मंजुल पब्लिकेशनहाउसने केले आहे.