सातार्यात बेकायदा दारूविक्री करणार्या पाचजणांना अटक
सातारा, दि. 4 (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्ग आणि राज्य मार्गालगतची दारू दुकाने बंद झाल्यानंतर त्याच परिसरात बेकायेदशीर दारूविक्री करणार्या पाचजणांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली.
महामार्ग व राज्य मार्गालगत असणारी दारू दुकाने आणि बिअरबार बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली होती. न्यायालयाच्या या आदेशानुसार सातारा जिल्ह्यातील सुमारे 502 दारू दुकाने आणि बार बंद झाले आहेत. हे बार आणि दुकाने बंद झाली तरीही त्या परिसरात दारूची बेकायदेशीर विक्री करण्याचा काहीजण प्रयत्न करत होते. याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी अशा परिसरात पाळत ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पाहणी करत असताना गोळीबार मैदानाजवळील दारू दुकानापासून पोलिसांनी प्रतीक चंद्रशेखर निकम (रा. अजिंक्य कॉलनी), सिध्दार्थ किसन गव्हाळे (रा. प्रतापसिंहनगर), अनिल बाबूराव मोहिते (रा. लक्ष्मीटेकडी), प्रशांत मानसिंग बल्लाळ (रा. गोवे, ता. सातारा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन हजार रुपये किमतीच्या दारुच्या बाटल्या जप्त केल्या. याच दरम्यान पोलिसांनी महामार्गालगत असणार्या एनएच 4 रेस्टो’ या हॉटेलजवळून कृष्णा गोपीनाथ नाईक (रा. खेड) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी दारूच्या 3 हजार 700 रुपयांच्या बाटल्या आणि एक दुचाकी जप्त केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.