Breaking News

महाविद्यालयांमध्ये ‘बडीकॉप’ची जनजागृती करणार - उपायुक्त शिंदे

पुणे, दि. 05 - पुणे शहरातील प्रामुख्याने महिलांच्या सुरक्षिततेची गरज ओळखून पुणे शहर पोलिसांच्या पुढाकाराने ‘बडीकॉप’ ही संकल्पना सुरू केली आहे. या संकल्पनेनुसार प्रत्येक कॉलेजमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याचे परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी पत्रकार परिषेदत सांगितले. काल घडलेल्या वाकडमधील घटनेविषयी त्यांना विचारले असता त्यांनी ही माहिती दिली.
काल वाकडमध्ये एका विद्यार्थीनीवर तिच्याच वर्गात शिकणार्‍या एकाने कोयत्याने वार केले. या घटनेत विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी प्रत्येक कॉलेजमध्ये बडीकॉप म्हणजेच पोलीस मित्राची जनजागृती करण्यात येणार आहे. कालच्या घटनेत पीडित मुलीने कॉलेजला अगदोर याची कल्पना दिली होती. कॉलेजने योग्य वेळी पोलिसांना सांगितले असते तर  हा प्रकार घडला नसता. त्यामुळे प्रत्येक कॉलेजने अशा प्रकारची तक्रार एखाद्या विद्यार्थीनीने केल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांकडे संपर्क साधावा, असे आवाहनही उपायुक्त शिंदे यांनी यावेळी केले.
पुणे पोलिसांनी सुरू केलेल्या बडीकॉप संकल्पनेनुसार मुलींचा एक ग्रुप तयार करण्यात येणार आहे. या ग्रुमपमध्ये एक पोलीस कर्मचारी ‘बडीकॉप’ म्हणजेच पोलीस मित्र म्हणून नेमण्यात येणार आहे.
काय आहे बडीकॉप ग्रुप ?
एका ग्रुपमध्ये 40 महिलांच्या पाठीमागे साधारण एक पोलीस कर्मचारी (बडीकॉप) असणार आहे. या ग्रुपमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी समाविष्ट असल्याने त्याचा आढावा घेण्यात येईल. प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये किमान 20 बडीकॉपचा ग्रुप तयार करण्यात येणार आहे. तसेच, शहरामध्ये एक हजाराहून अधिक बडीकॉप ग्रुप स्थापन करणार आहे.