Breaking News

सांज पाडवा कार्यक्रमाने बुलडाणेकर मंत्रमुग्ध

बुलडाणा, दि. 04 - दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दि. 28 मार्च 2017 रोजी गुडीपाडवा निमित्ताने ब्राम्हण सभा बुलडाणा तर्फे एडेड हायस्कुल बुलडाणा चे प्रांगणात सायं 6.30 वा सांज पाडवा ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये बुलडाणा येथील स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या मोगरा फुलला या कार्यक्रमाने रसीक मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच कु.कल्याणी व केतकी साबदे ह्या भगिनींनी सादर केलेल्या यमन रागातील तराणाच्या जुगलबंदीने रसीकांच्या मनाचा ठाव घेतला त्यानंतर मोगरा फुलला, जय शारदे वागेश्‍वी, प्रेमा काय देवु तुला, लेक लाडकी या घरची, ऐरणीच्या देवा अशी मनाला भावनारी गोड भावगिते/चित्रपट गिते कु.कल्याणी साबदे हिने सादर केलीत त्यासोबतच कु.केतकी साबदे हिने प्रेम वेडी राधा व कशी करू स्वागता ही गिते सादर करून रसीकांच्या मनाचा ताबा घेतला. त्या सोबतच आपल्या दमदार आवाजाची रसीक मनावर छाप  पाडत प्रा.मिलींद तळणीकर यांनी नारायणा रमा रमणा, घेई छंद मकरंद, प्रिये पहर, ह्या जन्मावर अशी अजरामर गीते सादर करून श्रोत्यांची वाहवाह मिळविली. तसेच सुभाष भालेराव यांनी मनासारखे जगायचे ही सुरेश भट यांची गझल सादर करून कार्यक्रमात रंग भरला शेवटी स्व.वीर सावरकर यांचे सागरा प्राण तळमळला ह्या भावस्पर्शी गिताने कार्यक्रमाची सांगता झाली.
ह्या संपुर्ण कार्यक्रमात हर्म्पोनियमवर आण्णासाहेब तळणीकर व सुभाष भालेराव यांनी उत्कृष्ट साथ दिली. तर तबल्यावर आनंद साबदे यांनी साथ देवुन गाण्यात रंभ भरला. त्यांनी ऐरणीच्या देवा ह्या गाण्याला दिलेला ठेका कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला ताल वाघाची साथ बाल कलाकार आदित्य साबदे याने दिली. ह्या संपुर्ण कार्यक्रमाचे दमदार निवेदन आपल्या गोड आवजातील विशेष शैलीमध्ये सौ.अर्चना देव यांनी केले असुन रसीकांना खिळवुन ठेवणार्‍या ह्या कार्यक्रमाची निर्मीती सौ.राधीका साबदे यांची होती.